नाशिक व जळगांवमध्ये पाण्याच्या साधनसुविधांच्या विकासासाठी दोन दिवसीय TOT प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM) मुंबई, जल जीवन मिशन, आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव व नाशिक यांच्या सहकार्याने राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नाशिक व जळगाव जिल्ह्यातील प्रशिक्षकांसाठी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षकाचे प्रशिक्षण (TOT) कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात एकूण 76 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षकांचे प्रशिक्षण तज्ञ मंदार वैद्य आणि दिनेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले. राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष भुपेन्द्र महाले यांनी देखील आपल्या विचारांचे योगदान दिले.
प्रशिक्षणाच्या यशस्वितेबद्दल KRC राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेच्या वतीने पुढील प्रशिक्षणाचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे पाणी पुरवठा योजनिसाठी साधन-सुविधा व तांत्रिक ज्ञानाचा विकास होईल. या उपक्रमामुळे प्रशिक्षकांना जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अधिक प्रगती मिळविण्यात मदत मिळेल.