*हिंदू नववर्ष निमित्त शिंपी समाजातर्फे जागर स्त्री शक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न.*
*मानवसेवेचा वसा घेतलेले मनिलालभाऊ शिंपी हे समाजातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत:* *समाजाध्यक्ष सौ.सुषमाताई सावळे.*
धुळे( प्रतिनिधी)हिंदू नववर्षा निमित्ताने अहिर शिंपी पंच संस्था धुळे व धुळे शहर शिंपी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने *जागर स्त्री समर्थाचा जागर स्त्री शक्तीचा* महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अखिल भारतीय महिला आघाडीचा राष्ट्रीय अध्यक्षा सुषमाताई सावळे,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी, समाजाचे जेष्ठ समाजसेवक अणि दानशूर दातृत्व असलेले समाज विश्वस्थ आदरणीय न.ल.भामरे बापू, धुळे शिंपी समाजाचे अध्यक्ष रमेशभाऊ शिरसाट,संत नामदेव महाराज पतसंस्थेचे चेअरमन भालचंद्र भंडारकर, आर एस पी चे विभागीय कमांडर दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष धुळे शहर महिला मंडळ ज्योतीताई जाधवयांच्या मार्गदर्शनाखाली विशेष आकर्षण प्रा.ललितभाऊ खैरनार होम मिनिस्टर फेम यांचा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलालभाऊ शिंपी यांचा सत्कार करताना अखिल भारतीय शिंपी समाज महिला आघाडीचा राष्ट्रीय अध्यक्षा सौ. सुषमाताई सावळे यांनी विशेष कौतुक करताना सांगितले की महाराष्ट्राचा लाडक्या बहिणींचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडके भाऊ आहेत.परंतु मनिलाल शिंपी हे समाजातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत.त्यांचा सहकार्यामुळे समाजातील गरजू समाज बंधू भगिनींना मोलाचे योगदान आणि सहकार्य लाभत आहे असे याप्रसंगी बोलताना सांगितले. धुळे महिला मंडळाचा जागर स्त्री शक्तीचा, श्री स्वामी समर्थांचा या कार्यक्रमासाठीही मनिलाल शिंपी यांनी दोन पैठणी, साड्या, व आकर्षक पर्स उपलब्ध करून दिल्या.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे होम मिनिस्टर फेम प्रा.ललित भाऊ खैरनार यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम अतिशय लयबद्ध आणि मनोरणनात्मक आविष्काराने सादरीकरण करण्यात आले.सदर कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे गेम महिलांकडून खेळण्यात आले. होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे गेम खेळून प्रत्येक गेम मधून एक एक महिलांना विजयी घोषित करण्यात आले.
त्यानंतर प्रत्येक विजयी महिलां मधून शेवटी एक फायनल राऊंड खेळण्यात आला त्यामधून तीन महिलांची निवड झाली. तसेच कार्यक्रमांमध्ये विनोद म्हणून पुरुषांचा देखील एक राउंड घेण्यात आला व *सुभाष सोनवणे* यांना विजयी घोषित करण्यात आले.
त्यानंतर महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले.
तीन विजयी महिलांना पैठणी भेट वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आले.
*विजयी महिलांची नावे खालील प्रमाणे*
1.पहिले बक्षीस रोहिणी संधानशीव
2.दुसरे बक्षीस सुषमा भांडारकर
3.तिसरे बक्षीस शीतल कापुरे
विजेत्या महिलांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
तसेच इतर विजयी महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
सदर कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण आनंदमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष ज्योतीताई जाधव व संपूर्ण महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. तसेच गणेश सोनवणे, राजेश सोनवणे, सुहास जगदाळे श्यामकांत जगताप, संजय कापुरे व इतर समाज बांधवांनी सहकार्य केले. सुषमाताई सावळे, रमेश भाऊ शिरसाठ, मनीलाल शिंपी, नरेंद्र बापू भामरे, भालचंद्र भांडारकर व इतर समाजातील पदाधिकारी यांनी पैठणीसाठी देणगी रक्कम दिली.
उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, समाज भगिनींचे सौ.मनिषा कापुरे यांनी आभार व्यक्त केले.