ना. गुलाबराव पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त उदया अमळनेरला शिवसेना व यशोदा फाउंडेशनचा भव्य नेत्र तपासणी शिबिर
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
ना. गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा पालकमंत्री तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शिवसेना व यशोदा फाउंडेशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ही महत्त्वाकांक्षी सेवा दिनांक 5 जून 2025 रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित केली जाणार असून, सर्व नागरिकांनी मोहिमेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन अमोल पाटील, आमदार पारोळा एरंडोल यांच्या हस्ते करण्यात येणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील आणि महिला शिवसेना प्रमुख सरिताताई माळी कोल्हे यांची उपस्थिती निश्चित करण्यात आलेली आहे. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा मोरे आणि डॉक्टर प्रशांत मोरे यांचा समवेत मोफत डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे.
शहर प्रमुख संजय कौतिक पाटील, तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील तसेच शिवसेना अमळनेरचे सर्व पदाधिकारी यावेळी शिबिराचे आयोजन करत आहेत. हे तपासणी शिबिर भांडारकर कँम्पाऊंड (खड्डाजीन), बस स्टँड समोर भागवत रोड, अमळनेर येथे पार पडणार आहे.
डोळ्यांच्या आरोग्यावर जागरूकता वाढविण्यासाठी आणि वेळेवर योग्य उपचार मिळवून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आयोजकांचे आवाहन आहे.