• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

हिंद भुमी टाईम्स च्या वतीने संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार 2024 प्रदान!

Jun 5, 2025

Loading

हिंद भुमी टाईम्स च्या वतीने
संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार 2024 प्रदान!

ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी) हिंदी पत्रकार दिनानिमित्त हिंद भुमी टाईम्स चे संपादक तथा समाजसेवक श्री.यूसुफ मन्सूरी
यांच्याकडून 2024 मध्ये
सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध क्षेत्रांतील पुरस्कार देऊन भिवंडी धामणकर नाका येथील सिटी सेंटर मॉलमध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य दै.स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार 2024
हिंद भुमी टाईम्स चे संपादक तथा समाजसेवक श्री.यूसुफ मन्सूरी यांच्या शुभहस्ते
प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना, ज्यामध्ये डॉक्टर, पोलीस, पत्रकार, शिक्षक आणि वकील यांच्यासह इतरांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याला लोकांसमोर आणणे हा होता, जेणेकरून इतरांनाही सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा भिवंडी युवा मोर्चा अध्यक्ष राजू चौघुले, माजी नगरसेवक वसीम अंसारी, समाजसेवक अकरम मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक अनंता वाघ, वकील खदीजा खान (मुंबई उच्च न्यायालय), माहेनूर खान (मुख्याध्यापिका), पत्रकारांमध्ये डाॅ.श्री.किशोर बळीराम पाटील
संपादक दै.स्वराज्य तोरण, फिरोज मेमन, अमृत शर्मा, आचार्य सुरजपाल यादव, संदीप गुप्ता, सोहेल अंसारी, सय्यद नकी हसन यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार यूसुफ मन्सूरी यांनी केले होते तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सज्जाद अख्तर यांनी केले. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपच्या वतीने डॉ.मणिलाल शिंपी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव तसेच चंद्र आनंद कृषी पणन संस्थेचे अध्यक्ष डॉ. यशवंत म्हात्रे, समाजसेवक उद्योजक डॉ. रामचंद्र देसले, नागरी संरक्षण दलाचे मोटिवेशनल स्पीकर डॉ. किशोर आढळकर, पोलीस पाटील संघाचे माजी अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, स्वामीनारायण मंदिर हॉलचे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, रोटी डे ग्रुपचे प्रमुख डॉ. नितील चंदिया, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूरचे अध्यक्ष श्री. संजय शेंडे साहेब, उपाध्यक्ष पी एस महाजन सर, प्रशिक्षण प्रमुख पोहरे सर, खजिनदार श्याम फाळके, विभागीय समादेशक दिलीप स्वामी या सर्वांकडून दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉक्टर किशोर पाटील यांना नॅशनल पत्रकार पुरस्कार 2024 मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *