• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पर्यावरण रक्षणाची गरज: साई इंग्लिश अकॅडमी व वन विभाग यांचा संयुक्त उपक्रम”

Jun 5, 2025

Loading

“पर्यावरण रक्षणाची गरज: साई इंग्लिश अकॅडमी व वन विभाग यांचा संयुक्त उपक्रम”

अमळनेर प्रतिनिधी: जागतिक पर्यावरण दिनाचे
औचित्य साधून साई इंग्लिश अकॅडमि , वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर व वनक्षेत्र पारोळा यांच्या
संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनपाल
गुलाब समसोददीन पिंजारी(वनक्षेत्र, पारोळा – प्रादेशिक) यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, जगभरात पर्यावरणाशी संबंधित समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. त्यासंदर्भात
जनजागृती आवश्यक आहे. कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनी अनुभवले. वृक्ष हेच प्राणवायूचे खरे स्त्रोत आहेत, म्हणून वृक्षारोपण आणि संगोपन ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रोपांचे
वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आम्हाला मिळालेली रोपे आम्ही आमच्या घराच्या परिसरात, शेतात लावून त्यांची रोज
काळजी घेऊ व वाढदिवसही साजरे
करू.”कार्यक्रमाचे प्रास्ताविक साई इंग्लिश
अकॅडमिचे संचालक भैय्यासाहेब मगर यांनी केले. पर्यावरणाविषयी घोषवाक्यांचे सादरीकरण कु. कल्याणी पाटील हिने केले.
सूत्रसंचालन कु. नेहा पाटील हिने केले तर आभार प्रदर्शन कु. हिमानी पाटील हिने मानले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकवृंद, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सोहळा
यशस्वितेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. मनोज कापुरे, वनपाल वैशाली साळी मॅडम, वनपाल सुनिता धनगर मॅडम, वनरक्षक श्री. दिनेश देवरे, वनरक्षक सिमा शिंदे मॅडम व
वनमजूर दिनेश सैदाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण होऊन वृक्षारोपणाच्या संस्कारांचे
रोपण निश्चितच झाले, हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *