*राज्यकर्त्यांनी शाहू महाराजांचे चरित्र प्रामाणिकपणे वाचल्यास,अंगिकारल्यास त्यांच्या चारित्र्यात निश्चितपणे बदल होईल-मुकुंद सपकाळे
भारतीय सामाजिक, राजकीय,शैक्षणिक,औद्योगिक व्यवस्थेत आपल्या आचरणातून नवा इतिहास रचणाऱ्या, सामाजिकतेला नवा विचार देणाऱ्या महान राजाने अर्थात राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या साऱ्यांना आदर्शव्रत अशी पाऊलवाट निर्माण करून दिली असून राज्यकर्त्यांनी शाहू महाराज यांचे चरित्र प्रामाणिकपणे वाचल्यास, अंगिकारल्यास त्यांच्या चारित्र्यात निश्चितपणे बदल घडवून येईल असे विचार सत्यशोधकी साहित्य परिषद,भीम रमाई प्रतिष्ठान, कास्ट्राईब कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद बागुल होते.प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे याप्रसंगी बोलताना म्हणाले, शाहू महाराजांनी सामान्य आणि गोरगरीब जनतेला आपल्या जीवनाची नवी दिशा प्राप्त करून देण्याकरता स्वतःच्या आचरणातून प्रयत्नशील राहून प्रामाणिकपणे राज्यकारभार केल्याचे दिसून येते, अस्पृश्यता निर्मूलन आणि जनतेचा विकास साधण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात नवनवीन अशा सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार प्रदर्शन साहेबराव बागुल यांनी केले कार्यक्रमास विजयकुमार मौर्य, अनिल सुरडकर, महेंद्र केदार, युवराज माळी, ज्योती वाघ बाविस्कर, गौतम बाविस्कर,सोमा भालेराव, विजय करंदीकर व अनेक मान्यवर उपस्थित होते.