परसबाग उपक्रम शाळांमध्ये प्रभावीपणे राबवा-विजय पवार अधीक्षक पी एम पोषण जळगाव
जळगाव -प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत परसबाग उपक्रमाची कार्यवाही बाबत मार्गदर्शन करण्यासाठी जळगाव शहर व ग्रामीण भागातील शाळा मुख्याध्यापकांची ऑनलाईन सभा घेण्यात आली. सभेला जळगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सरला पाटील, शा पो आ अधीक्षक विजय पवार,शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले व सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सुशील पवार सर यांनी केले. शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार यांनी मार्गदर्शन करतांना परसबाग उपक्रमाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, गरज व फायदे याबाबत सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक साधताना परसबागेतील पालेभाज्यांच्या माध्यमातून पोषक तत्वे मिळतील, तसेच विद्यार्थ्यांच्या नावीन्यतेला चालना मिळेल असेही विजय पवार यांनी सांगितले.प्रत्येक शाळेने या उपक्रमात सहभागी होऊन केंद्र शासनाच्या पोर्टलवर माहिती भरावी, तसेच परसबाग स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
जळगाव तालुका स्तरीय शालेय परसबाग स्पर्धा माहे सप्टेंबर -ऑक्टोबर मध्ये घेण्यात येईल.
प्रथम क्रमांक -बक्षीस साडेसात हजार
द्वितीय क्रमांक -बक्षीस पाच हजार
तृतीय क्रमांक -बक्षीस तीन हजार, तर प्रोत्साहन पर तीन शाळांना दोन हजार याप्रमाणे पारितोषिक देण्यात येणार आहे. यामध्ये शाळांना विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्वयंपाकी -मदतनीस यांचा सहभाग घेऊन परसबाग विकसित करता येईल असे सांगण्यात आले. सर्व शाळांचे मुख्याध्यापक सभेला उपस्थित होते.