सायबर युगात सुरक्षितता माणसासाठी ठेवा -उमाकांत बडगुजर
विज्ञान तंत्रज्ञानाच्या सोबतच आजच्या काळातील सायबर युगात सुशिक्षित पद्धतीने माणसालाच माणसाकडून फसवले जाण्याची वृत्ती अधिकाधिक वाढत जात असून ज्ञानाचा उपयोग माणसाच्या प्रगतीसाठी होण्याऐवजी माणूसच माणसाच्या अडचणीचा मार्ग ठरू पाहत असल्याचे अनेक उदाहरणं सायबर युगात लक्षात येत असल्याचे मत सायबर तज्ञ उमाकांत बडगुजर यांनी सायबर सुरक्षितता व जागरूकता या विषयांतर्गत सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते विचार मंचावर विवेक खडसे, दिलीप बोंडे, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते
याप्रसंगी बोलताना उमाकांत बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना सायबर युगात सुरक्षितता महत्त्वाची असून मोबाईल हा ज्ञानापुरता सिमित ठेवत आपल्या विकासाच्या वाटा उपलब्ध करून घेण्याकरता त्याचा वापर करण्यात यावा त्याचा गैरवापर हा अनेकांच्या जीवनाला धोका पोहोचवणारा असल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले
कार्यक्रमात भ्रमणध्वनीचे संदेश, निनावी कॉल, सायबर गुन्हे, अपरिचित व्यक्तींनी पाठविलेले विविध संदेश, ॲप याबद्दल सविस्तर माहिती देऊन विद्यार्थिनींना अधिक जागरूक राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. अरफिया पिंजारी हिचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वृषाली चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन सौ. शुभांगिनी महाजन यांनी केले.