गुलाबराव पाटील फाउंडेशन तर्फे सार्वजनिक विद्यालयात पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तरांचे वाटप .
असोदा: येथील सार्वजनिक विद्यालयात गुलाबराव पाटील फाउंडेशन तर्फे दप्तर व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. पितृछत्र हरपलेल्या, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी ,त्यांचे भविष्य उज्वल घडावे हा मा. ना. गुलाबरावजी पाटील पालकमंत्री जळगाव यांचा मानस आहे. या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, संस्थेचे अध्यक्ष विलासराव चौधरी, तुषार महाजन, बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी,अजय महाजन,गिरीश भोळे, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल ,पर्यवेक्षक एल. जे. पाटील,उमेश बाविस्कर,सुनील पाटील, व गावातील महेंद्र जोहरे, बाळू पाटील,ललित कोळी,संदीप नारखेडे,शरद नारखेडे,जीवन नारखेडे,संजय बिऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी या दातृत्वाविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. जी. महाजन यांनी, तर आभार भारती पाटील यांनी मानले.