• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

भुसावळ तालुका शालेय मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न .

Aug 8, 2024

Loading

भुसावळ तालुका शालेय मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न .

खेळाडूंनी खेळ आनंदसाठी खेळावा उमेश महाले भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व सेंट अलाॅयसेस स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19वर्षा आतील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन वाहतूक पोलीस शाखेचे उमेश महाले यांच्या हस्ते बुद्धिबळ खेळ खेळून उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी सेंट अलाॅयसेस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर सलमा ,महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, भुसावळ तालुका समन्वयक डॉ‌ प्रदीप साखरे ‌, तांत्रिक समिती सदस्य मेघाश्याम शिंदे, प्रा. मनोज वारके, आर. आर.धनगर ,वंदना ठोके, यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक व खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते.

उद्घाटन पर भाषणामध्ये उमेश महाले यांनी विद्यार्थ्यांनी खेळ हा जिंकण्यासाठी खेळावा परंतु तो आनंदा साठी खेळावा. म्हणजेच जय विजय आपल्याला पचवता येतो . विजय मिळवण्याचे प्रयत्न करावे पण अपयशाने खचून जाऊ नये. शिक्षणाबरोबर खेळांना महत्व दिले पाहिजे खेळामुळे आपला शारीरिक मानसिक व सर्वांगीण विकास होतो.

भुसावळ तालुका मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 14 वर्षाखालील मुली* अंतिम निकाल 1) श्रीवास्तवा संभवी द वर्ड स्कूल 2)पवार काजल द वर्ड स्कूल 3)सिंग जागृती डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल 4)नेहते रूपाल हे नारखेडे विद्यालय 5)मोरे आर्या ताप्ती पब्लिक स्कूल
17 वर्षाखालील मुली 1)चौधरी भाग्यश्री के नारखेडे विद्यालय 2) वारुळे जागृती अहिल्यादेवी विद्यालय 3) नेहते सानिका सेंट अलायसेस 4) सोनार आर्या सेंट अलायसेस विद्यालय 5)ओगले भाग्यश्री अहिल्यादेवी विद्यालय. *१९ वर्ष वयोगट मुली त्यात
१) क्रिपा मंगलानी. नाहाटा कॉलेज
२) कीर्ती पाटील. नाहाटा कॉलेज
३) मीनल गिरणारे, नाहाटा कॉलेज
४) निकिता नेहते. नाहाटा कॉलेज
5) तैयबा सरताज थेख. बी झेड स्कूल
हे विजयी झाले पंच म्हणून प्रवीण ठाकरे ,मिलिंद शिरोडे यांनी काम पाहिले यांनी. स्पर्धेसाठी तांत्रिक सदस्य म्हणून समन्वय डॉ. प्रदीप साखरे, तांत्रिक सदस्य मेघश्याम शिंदे , प्रा. मनोज वारके यांनी काम बघितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघश्याम शिंदे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी, कोळी, निलेश नेहते,
अलेस्टर सिमोन ,अजय डोळे, बॉबी पवार ,सुमित दास गुप्ता अदर शेख यशस्वीतेसाठी, कोळी सर, पराग पाटील, यांच्यासह सेंट अलाॅयसेस स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed