पहिल्याच प्रयत्नात दोघे भाऊ SET परिक्षा उत्तीर्ण
चोपडा-चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील रहिवासी ह. मु. विष्णापूर ता. चोपडा येथील प्रगतिशील शेतकरी हिरालाल भगवान पेंढारे यांचा मुलगा चि. गणेश हा कबचौ उमवि, जळगाव येथे एम.एस्सी. (रसायनशास्त्र) दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असतांना सेट परिक्षा उत्तीर्ण झाला .त्याचबरोबर लहान भाऊ देविदास भगवान पेंढारे यांचा मुलगा भरत हा एम.ए.अर्थशास्त्र असून तो सुद्धा सेट परीक्षा उत्तीर्ण झाला. दोन्ही भूमिपुत्रांनी हे उज्वल यश संपादित केल्यामुळे सर्व स्तरातून दोन्ही भावांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.