हेमलता भदाणे यांनी समर्पित भावनेने विद्यार्थ्यांना घडवलं – अनिल बोरनारे
आदर्श शिक्षिका हेमलता भदाणे सेवानिवृत्त
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतांना विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार पुस्तकी ज्ञानाबरोबर जीवन शिक्षण देणाऱ्या हेमलता भदाणे यांनी समर्पित भावनेने विद्यार्थ्यांना घडवलं असे प्रतिपादन शिक्षक नेते मुंबई मराठी अध्यापक संघांचे व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले
उल्हासनगर येथील शांतीग्राम विद्यामंदिरच्या विद्यार्थिप्रिय शिक्षिका हेमलता भदाणे यांच्या सेवापूर्तीचा सोहळा कल्याण येथील शारदा विद्यामंदिरच्या सभागृहात संपन्न झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोरनारे बोलत होते यावेळी ब्राह्मणपाडा सोसायटीच्या चेअरमन स्नेहा गावडे जवाहर बाल भवन नियमक मंडळाचे सदस्य प्रशांत भामरे, राज्याचे मंत्री इंद्रनील नाईक यांचे खाजगी सचिव उद्धव भामरे
मुंबई क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विशाल बावा निवृत्त एअर फोर्स ऑफिसर यादवराव पाटील, पालघर जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे हेमलता भदाणे यांचे सुपुत्र व चित्रपट कलावंत ललित प्रभाकर यजमान प्रभाकर भदाणे ज्येष्ठ भगिनी विजया पाटील मातोश्री शकुंतला देसले आदी उपस्थित होते.
दैनंदिन अध्यापनासोबत हेमलता भदाणे यांनी मराठी अध्यापक संघ भूगोल संघात स्वतः ला सक्रिय ठेवले. आपल्या विषयाबाबत स्वतःला अद्ययावत ठेऊन ३३ वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले. मराठी विषयाचा अभ्यास करून शोध निबंध सादर केला पुनर्रचित अभ्यासक्रमात तज्ञ् मार्गदर्शक म्हणून काम करून शिक्षकांना मार्गदर्शन केले असेही बोरनारे यांनी सांगितले
हेमलता भदाणे यांच्या ३३ वर्षाच्या अध्यापन व इतर सामाजिक कार्यावर आधारित अंकाचे प्रकाशनही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या अंकात अनेक मित्र मैत्रिणींनी भदाणे यांचे कार्य अधोरेखित केले.