*ठाणे शहर वाहतूक उपायुक्तालयात आर एस पी अधिकारी शिक्षक सहविचार सभा संपन्न .*
*ठाणे जिल्ह्यात प्रत्येक शाळेत आर एस पी पथक तयार करावे: वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट.*
ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त माननीय श्री.पंकजजी शिरसाट यांचा अध्यक्षतेखाली, सहायक वाहतूक पोलिस उपायुक्त मा.भोसले साहेब,वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र शिरसाट साहेब,विभागीय समादेशक दिलीप स्वामी सर,विभागीय समादेशक डॉ. मनिलाल शिंपी,कल्याण डोंबिवली जिल्हा समादेशक श्री अनंत किनगे सर, समाजसेवक व आर एस पी जिल्हा मार्गदर्शक श्री.माणिक पाटील यांचा उपस्थितीत ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्तालय कार्यालयात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ची २०२५/२०२६ या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमावर सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी वाहतूक उपायुक्त माननीय पंकज शिरसाट यांनी प्रथम ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे कार्य उल्लेखनीय आहे असा कौतुकास्पद उल्लेख करत,वर्षभरात प्रत्येक आर एस पी अधिकारी शिक्षक यांनी आपल्या शाळेत किमान दोन पथक तयार करून महिन्यातून दोन दिवस पदकवायत, वाहतूक इशारे याविषयी प्रॅक्टिकल करुन घ्यावे, व जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत RSP पथक तयार करण्यात यावे, यासाठी वाहतूक विभागाकडून कोणतीही मदत लागली ती पूर्ण करण्यात येईल असे मार्गदर्शन करताना सांगितले.तसेच जिल्ह्यातील प्रशिक्षित RSP अधिकारी शिक्षकांची माहिती पोलिस विभागाचा वेब साइट ऑनलाइन देण्यात येईल. विभागीय समादेशक दिलीप स्वामी यांनी सांगितले की, पोलिस विभागाचा मार्गदर्शनाखाली आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कार्य करेल, व जास्तीत जास्त आर एस पी विद्यार्थ्यांचे पथके यावर्षी तयार होतील याबाबत आश्वासन दिले.विभागीय समादेशक डॉ.मनिलाल शिंपी यांनीही आपत्कालीन परिस्थितीत आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट व एन एस एस छात्रसैनिक यांना कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात यावे, आणि प्रत्येकाला वाहतूक विभागाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तर पदकवायत, पथनाट्य, विविध उपक्रम राबविण्यात शिक्षकांमध्ये आणि महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होईल असे मत व्यक्त केले.कल्याण डोंबिवली जिल्हा समादेशक श्री अनंत किनगे यांनी विशेष आभार व्यक्त केले.यावेळी ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक जितेंद्र सोनवणे, कळवा मुंब्रा समादेशक श्री.संजय खैरनार,डोंबिवली समादेश किरण वसईकर,उल्हासनगर समादेशक संतोष गोरडे, ठाणे शहर समादेशक बाळा साठे, आर एस पी अधिकारी शिक्षक श्री.गोकुळ गवळी,संग्रामसिंह राजपूत, मॉडेल कॉलेजचे प्रा.सुभाष गायकवाड, काशिनाथ गोसावी सर,ठाणे येथील श्री.सतीश पाटील, तुकाराम खाटघरे,श्री.सुब्रमण्यम सर,प्रा.दयानंद कांबळे, प्रा.विशाल सोनवणे,गोपाळ राव डिक्कुला,योगेश अहिरे,निवृत मुख्याध्यापक विजय भामरे, सम्राट अशोक विद्यालयाचे ओमप्रकाश धनविजय, गायत्री विद्यालयाचे भीमराव भालेराव सर,वाशी येथील यशवंत पवार यांच्यासह सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक यांनी सभेला उपस्थिती लावली त्याबद्दल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांनी धन्यवाद व्यक्त केले.