नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार समाजकार्य विषयाचा अभ्यासक्रम आराखडा निश्चितीसाठी कार्यशाळा
खासदार स्मिताताई वाघ यांनी केले उद्घाटन व वृक्षारोपण
अमळनेर प्रतिनिधी
येथील श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडीत जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, समाजकार्य अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम आराखडा नवीन शैक्षणिक धोरण नुसार निश्चित करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळा उद्घाटन दीपप्रज्वलन जळगांव खासदार स्मिताताई वाघ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष भांडारकर, अध्यक्ष अभिजीत भांडारकर, सचिव गीत भांडारकर, संचालक विवेकानंद भांडारकर , सिनेट सदस्य डॉ संदीप नेरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ, भगिनी मंडळ चोपडा येथील प्राचार्य डॉ ईश्वर सौदणकर, अमळनेर समाजकार्य महाविद्यालय प्राचार्य डॉ पी एस पाटील, समाजकार्य अभ्यास मंडळ अध्यक्ष प्रा डॉ जगदिश सोनवणे , आधार बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष डॉ भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद, राष्ट्र विकास संस्था सचिव तुषार पाटील व मान्यवर यांची उपस्थिती होती.
खासदार स्मिताताई वाघ यांनी विकसित भारत करणेसाठी समाजकार्य एक महत्व पूर्ण विद्याशाखा आहे असे प्रतिपादन केले.
कार्यशाळेत समाजकार्य विषयावरील तीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी , लेखक
प्रा विजयकुमार वाघमारे,
सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लेखक प्रा विजयकुमार वाघमारे, चेतन थोरात या इंग्रजी पुस्तक प्रकाशन,
तसेच सामाजिक कार्य: कौशल्य, व दृष्टिकोन या विषयातील लेखक डॉ अर्चना पाटील, प्रा वनश्री बैसाने , अनिता काळे यांचे मराठी माध्यमातील पुस्तक प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कार्यशाळा संबोधन सिनेट सदस्य डॉ संदीप नेरकर यांनी केले . संस्थेचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर यांनी अध्यक्षीय भाषण केले.
समाज कार्य अभ्यास मंडळ सदस्य डॉ रघुनाथ महाजन, डॉ सागरराज चव्हाण, डॉ अस्मिता सर्वैया, प्रा विरेश पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी संस्थेचे वतीने डॉ अदिती निलेश भांडारकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ पी एस पाटील यांनी मानले. तर सूत्र संचलन प्रा डॉ भरत खंडागळे, यांनी केले.