
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून,रोटी डे ग्रुप तर्फे आदिवासी पाड्यात स्वीट व भोजन वाटप. ठाणे,कल्याण ( प्रतिनिधी) मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा सहकार्याने, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, या या नुसार रोटी डे ग्रुपचे प्रमुख डॉ.नितील चंदेईया,डॉ.निलेश नागडा, यांचा सहकार्याने कल्याण रोटी डे ग्रुप तर्फे, गोवेगाव जवळील आदिवासी पाड्यात ५०० कुटुंबांना स्वीट व भोजन वाटप करण्यात आले.यामध्ये पावभाजी, गुलाब जामुन, कॅडबरी, मसालेभात, फराळ ,कपडे अश्या प्रकारे आदिवासी पाड्यात सर्वांसोबत आनंदात व उत्साहात दिवाळी सण साजरा करण्याचा आनंद मिळाला. दिवाळी सण आदिवासी पाड्यात साजरा करण्यासाठी रोटी डे ग्रुपचे प्रमुख डॉ. नितीलभाई चंदेयिया,डॉ.निलेश नागडा, जतिन जोशी, संजय कुमार, दिनेश सैनी, रोहित गुप्ता, खुशबू मालवीय, नीरज नागरणी, भावेश सोळंकी, महेश पिल्लई, डॉ. दिनेश भाई ठक्कर,अरविंद शिंपी, प्रीती नितिका सैनी, नैतिक सैनी, भिमराव साबळे,संतोष, रिनी, देवांशी, हिमांशू,यांचे मोलाचे योगदान आहे.