• Mon. Jul 7th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मारवड महाविद्यालयात न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.-

Nov 13, 2023

Loading

मारवड महाविद्यालयात न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.-

मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात आद्य संस्थापक ग्रामविकास शिक्षण मंडळाचे न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष. आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील,उपाध्यक्ष.आबासो. देविदास शामराव पाटील, सचिव आबाजी देविदास बारकू पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले,
याप्रसंगी ज्यु.कॉलेजचे माजी प्राचार्य एल.जे. चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कै. मन्साराम तुकाराम पाटील हे सहकार क्षेत्रातील तालुक्याचे नेते. तसेच लोकल बोर्ड सदस्य जळगाव.,संस्थापक अध्यक्ष अमळनेर तालुका शेतकी सहकारी संघ. संस्थापक चेअरमन मारवड विविध कार्यकारी विकास सोसायटी. मा. सरपंच ग्रामपंचायत मारवड, चेअरमन तालुका सुपरवायझर युनियन लिमिटेड अमळनेर मा. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर असे विविध क्षेत्रात उल्लेखनीय पदे त्यांनी भुषविले होते. यावेळी ज्येष्ठ संचालक बापूसो. महारु रामदास शिसोदे , संचालक. आण्णासो.सुरेश मन्साराम पाटील, आण्णासो साहेबराव नारायण पाटील, दादासो. सुरेश भिमराव शिंदे, दादासो. राजेंद्र फकीरा साळुंखे, भैय्यासो. दिनेश वासुदेव साळुंखे, बापूसो. प्रशांत वासुदेव साळुंखे, दादासो. चंद्रकांत सिसोदे, बापूसो. मनोज हिम्मतराव पाटील, तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. बापूसो. ए.डी. पाटील, दादासो.निंबा साहेबराव पाटील, आणि विद्यमान सरपंच ताईसो. सौ. आशाबाई सुभाष भिल , उपसरपंच बापूसो भिकन भालेराव पाटील, गोवर्धन चे सरपंच बापूसो पंकज युवराज निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले आणि प्राध्यापक , प्राध्यापकेतर कर्मचारी, ज्यु. कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *