गरीब व गरजू मुलांचा दिवाळी गोडवा वाढवला शिरूड येथील व्ही झेड पाटील हायस्कूल येथे गरीब व गरजू मुलांना कपडे व मिठाईवाटून दिवाळीचा गोडवा वाढवण्याचा प्रयत्न उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशन बदलापूर यांनी केला. बदलापूर येथील उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशन वाड्या वस्तीवरील मुलांना शैक्षणिक मदत तसेच मुलांना निवासी मोफत रहिवास व शिक्षण देण्याचे कार्य करीत असते. यावर्षी दीपोत्कर्ष उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बारा ठिकाणी 365 मुलांना दिवाळी फराळ व नवीन कपडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत शिरूड येथील व्ही झेड पाटील हायस्कूलमध्ये शिकत असलेले गरीब व गरजू 40 मुला मुलींना नवीन कपडे , बुट व मिठाईवाटप करून त्यांचा दिवाळी गोडवा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन श्रीमती पुष्पलता अशोक पाटील ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशन बदलापूर चे खजिनदार योगेश्वर पाटील सदस्य सुधाकर बोरसे, किरण पाटील , शालेय समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक खजिनदार योगेश्वर बोरसे यांनी केले. सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी मांडले. यावेळी सागर साहेबराव पाटील व डी सी पाटील यांची मनोगते व्यक्त केले. गावातील असंख्य मान्यवर व विद्यार्थ्यांचे पालक तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ तसेच सार्वजनिक मित्र मंडळ शिरूड यांनी परिश्रम घेतले.



