• Mon. Jul 7th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक – जिल्हा प्रशासनाची सूचना*

Jun 27, 2025

Loading

*सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक – जिल्हा प्रशासनाची सूचना*

जळगाव, दि. २७ जून (जिमाका): शेतकरी व इतर कर्जदार नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने सावकारांकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला आळा बसावा यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या “महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४” अंतर्गत राज्यातील सर्व परवानाधारक सावकारांनी आपल्या व्यवसाय स्थळी व्याजदरासंबंधी स्पष्ट माहिती असलेला फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या फलकावर सावकाराचे नाव, परवाना क्रमांक, कार्यक्षेत्र, परवाना जारी करणाऱ्या कार्यालयाचे नाव व विविध प्रकारच्या कर्जांवर आकारण्यात येणाऱ्या व्याजदरांची माहिती देणे आवश्यक आहे. हा फलक व्यावसायिक ठिकाणाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात यावा, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाने केली आहे.

शासनाने सावकारांसाठी व्याजदराची मर्यादा ठरवून दिली आहे. शेतकऱ्यांसाठी तारण कर्जावर जास्तीत जास्त ९ टक्के व विनातारण कर्जावर १२ टक्के प्रतिवर्ष व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी १५ टक्के, तर तारण कर्जासाठी १८ टक्के अधिकतम व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे. हे नियम सर्व परवानाधारक सावकारांसाठी बंधनकारक असून, अशा फलकाची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *