पारोळा येथील राजवड आदर्श गावात शेत रस्त्यांचे अतिक्रमण मुक्ती; तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांचा शेतकऱ्यांचा कृषीभूषण पाटील यांनी केला सत्कार
पारोळा प्रतिनिधी– महसूल प्रशासनाच्या व लोकसहभागातून पारोळा येथील राजवड (आदर्श गाव) येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाणाऱ्या शेत रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करुन शेत स्त्यावरील अतिक्रमण मुक्त शेत रस्ते तयार केले आहेत. या महतीपुर्ण उपक्रमासाठी माननीय तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, सहाय्यक महसूल अधिकारी श्री महेश जाधव, निंबाळकर मंडळ अधिकारी, तलाठी राकेश काळे यांचा सिंदूर लावून शेतकऱ्यांनी सत्कार केला.
यावेळी कृषि भूषण साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी व ग्रामस्थांनी हरी बापू, पप्पू सूर्यवंशी, पिंटू मास्तर, सुभाष काका, श्रीमती मैराळे ताई, यशवंत पाटील, नरेंद्र पाटील (छोटू), हादिश खाटीक, संभाजी पाटील, सुकलाल जिभू, वसंत बापू, अशोक नाना, गोकुळ पाटील, नितीन पाटील, सचिन पाटील, प्रमोद पाटील, सुरेश पाटील, किरण परदेशी, नागेश परदेशी, अरुण पाटील (पिंटू) आदींनी सहभागी होऊन या पुढाकाराला बळकटी दिली.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील कामासाठी सहज आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला असून, येथील शेती व ग्रामीण विकास प्रक्रियेला चालना मिळाली आहे. अतिक्रमणमुक्त शेत मार्गामुळे येथील शेतकऱ्यांचा जीवनमान सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे.
या आदर्श प्रयत्नासाठी महसूल प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांचे कौतुक होत असून, भविष्यात अशी सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी अशी मोहीम सतत चालू ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.